विनोद तावडेंनी नाचत केलं बाप्पाचं स्वागत
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतील ` सेवासदन ` या निवासस्थानी मिरवणूक काढत वाजतगाजत दीड दिवसाच्या श्रीगणेशाचे आगमन झाले.
मुंबई / नागपूर : शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतील ' सेवासदन ' या निवासस्थानी मिरवणूक काढत वाजतगाजत दीड दिवसाच्या श्रीगणेशाचे आगमन झाले.
मिरवणुकीत विनोद तावडे सहकुटुंब सहभागी झाले होते. त्यांनी ढोल-ताशांच्या ठेक्यावर नाचतच बाप्पाचं स्वागत केलं. विनोद तावडे यांनी ' ट्री गणेशा ' या संकल्पनेवर आधारित इको फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
गडकरींच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा
नागपुरात नितीन गडकरींच्या घरीही गणरायाची स्थापना करण्यात आलीय. गडकरी वाड्यात गणपतीच्या सरबराईची आणि आदरातिथ्याची लगबग आहे. गडकरींनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली.
'आमच्या देशाला सुख, समृद्ध, संपन्न बनवण्याची शक्ती दे' असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं.