नागपूर : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी नॅशनल कॅसर इंन्स्टिट्युट कोव्हिड सेंटरचे उद्घाटन समारंभात उपस्थित होते. या कार्यंक्रमात संबोधित करताना त्यांनी लोकांना कोव्हिडच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल इशारा दिला. दुसऱ्या लाटेच्या यापेक्षाही गंभीर परिस्थितीसाठी तयार रहा. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.


कोरोना कधीपर्यंत चालणार याची काही गॅरंटी नाही - गडकरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोरोना व्हायरस आणखी किती खतरनाक होऊ शकतो. आणि केव्हा पर्यंत चालेल याची काही गॅरंटी नाही.  
 सध्या कुटूंबचे कुटूंब कोव्हिडने ग्रस्त होत आहेत. येत्या 15 ते 30 दिवसात जास्त परिस्थिती बिकट होऊ शकते. आपण सर्वोत्तमचाच विचार करावा परंतू कठीणातील कठीण परिस्थितीसाठीही तयार असायला हवे. या महामारीशी मुकाबला करण्यासाठी दीर्घ नियोजनाची गरज आहे. असे गडकरी यांनी यावेळी म्हटले.


 लवकरच रेमडेसिविरची कमी भरून निघणार


 देशात फक्त 4 कंपन्यांकडे कोव्हिड19 विरोधी औषध निर्माणाचा परवाना आहे. केंद्र सरकारने आणखी 8 कंपन्यांना औषध निर्माणाची परवानगी दिली आहे. ज्यामुळे रेमडेसिविरची कमी भरून निघणार आहे.