शिर्डी : साईबाबा समाधी वर्षासाठी ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याचा वादग्रस्त निर्णय साईबाबा संस्थानाने अखेर मागे घेतलाय. शिर्डीच्या साईबाबांची महीती जगभरात पसरली आहे. साईंचा महिमाच मोठा असल्याने साईंना कोणत्याही ब्रँड अँबेसेडेरची गरज नसल्याच भावना साईभक्तांनी आणि काही शिर्डीकरांनी व्यक्त केल्या होत्या अखेर  साई संस्थानने जनभावना लक्वाषात घेता हा निर्णय मागे घेतल्याच जाहीर केलय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीत साईबांबानी फकीराच जीवन व्यतीत केल शिर्डी सबका मालिक एकचा संदेश साईंनी दिला. साईबाबांनी शिर्डीत 15 ऑक्टोबर रोजी आपला देह ठेवला त्या नंतर 18 ऑक्टोबर रोजी साईंना येथील बुटीवाड्यात समाधी देण्यात आली या घटनेस पुढच्या वर्षी 100 वर्षे पुर्ण होत असल्याने साई समाधी शताब्दी वर्ष साजरं केलं जाणार आहे. येत्या 1 ऑक्टोबर 1917 ते 18 ऑक्टोबर 1918 या कालवधीत शिर्डीत महाशताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे या साठी साईबाबा संस्थन तयारी करतय. 


साई संस्थान बॉलीवूड किंवा टॉलीवूड मधील अभिनेत्याला ब्रँड अँबेसिडेर करु इच्छित होते मात्र शिर्डीला येणा-या साईभक्तांना साईबाबांना कोणत्याही ब्रँड अँबेसिडेरची गरज नसल्याचं वाटत. साईंच्या महतीमुळेच जगभरात साईमंदीरे निर्माण झाली आहे तसेच भक्त शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी स्वत: होवून शिर्डीत येतो त्या मुळे साईंना कोणत्याही ब्रँडची गरज नाहीये.