तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील सात पुजाऱ्यांना मंदिरात गैरवर्तन केल्याप्रकरणी वेगवेगळ्या कालावधीसाठी मंदिरात प्रवेश बंदीची शिक्षा देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील वर्षभरात पुजाऱ्यांनी मंदिरात केलेल्या वेगवेगळया गैरप्रकार प्रकरणी मंदिर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. यात दर्शन रांगेत भक्तांची घुसवाघुसवी करणे, सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, धक्काबुकी करणे, तसेच मंदिरात आलेल्या भक्तांसोबत गैरवर्तन करणे यांसारख्या विविध कारणावरून आलेल्या तक्रारीच्या आधारे मंदिर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.


तुळजापूर मंदीरात अडीच हजार ते तीन हजार पुजारी आहेत. मंदिर संस्थानच्या नियमाप्रमाणे पुजाऱ्यांनी मंदिरात गैरवर्तन केल्यास ठराविक कालावधीसाठी संबंधित दोषी पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी करण्याचा अधिकार तुळजाभवानी मंदिर प्रशासनाला आहे. त्याप्रमाणे मंदिर प्रशासनाने ही कारवाई केल्याने गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांचं धाबे दणाणले आहेत.