मुंबई : शासनानं वस्तू तसंच सेवा कर कायदा सक्तीचा केला असताना कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या सराफ बाजारात मात्र सर्रासपणे जीएसटी आणि विना जीएसटीचे व्यवहार सुरु आहेत. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोन्याचा प्रतितोळा दर ३३ हजारांवर पोहचलाय. तर  जळगावच्या सराफ बाजारात मात्र सोन्याला प्रतितोळा ३२ हजार २०० रुपये एवढ्या दराचा फलक लावण्यात आलाय.


ग्राहकांमध्ये संभ्रम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तफावतीच्या दरामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. जळगावात सराफ बाजार खुलताच आर. सी.  बाफना ज्वेलर्समध्ये सोन्याला प्रतितोळा ३२ हजार २०० रुपये इतका दर सोन्याला जाहीर करण्यात आला. तसा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेही लावण्यात आला होता.


सोनेखरेदीचा आनंद


मुंबईपेक्षा कमी दरात सोने मिळत असल्यानं ग्राहकांनी सोनेखरेदीचा आनंद लुटला. तर फलकावर लावलेला दर हा विना जीएसटी असल्याचा खुलासा आर. सी. बाफना सुवर्णपेढीच्या संचालकांनी केला.