समृद्धी महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही-शेतकऱ्यांचा निर्धार
मुंबई-नागपूर या दोन शहरांना जोडणा-या समृद्धी महार्मागासाठी एक इंचही जमीन देणार नाही. तरीही सरकारने जबरदस्ती केली तर सामूहिक आत्महत्येचा निर्वाणीचा इशाराच शेतक-यांनी दिलाय.
नाशिक : मुंबई-नागपूर या दोन शहरांना जोडणा-या समृद्धी महार्मागासाठी एक इंचही जमीन देणार नाही. तरीही सरकारने जबरदस्ती केली तर सामूहिक आत्महत्येचा निर्वाणीचा इशाराच शेतक-यांनी दिलाय. या संदर्भात समृद्धी प्रकल्पामुळे बाधित होणा-या गावांच्या प्रतिनिधींची बैठक नाशिकमध्ये झाली. त्यात शेतक-यांनी आपला हा निर्धार व्यक्त केला.
समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांतली मिळून एकंदर ४९ गावं बाधीत होताहेत. असंख्य शेतक-यांचं हजारो एकर क्षेत्र आणि घरं यात उध्वस्त होणार आहेत. पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही शेतक-यांच्या जमिनीवर बुलडोझर चालवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु असल्याचा आरोप यावेळी शेतक-यांनी केला.
दरम्यान प्रकल्पासाठीचा शेतक-यांचा विरोध शांत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतक-यांना ५ पट मोबदला जाहीर करण्यात आलाय. मात्र त्यालाही शेतक-यांनी तीव्र विरोध केलाय. सरकरनं जाहीर केलेल्या दर पत्रकाच्या प्रतीची ठिकठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी होळी केली.