औरंगाबाद : औरंगाबाद महावितरणकडून जगप्रसिद्ध अजिंठा - वेरुळ लेण्यांची वीज कापण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंठा कार्यालयाकडे ४३ लाख तर वेरूळ कर्यालयाकडे ४५ लाख रूपयांचे वीज बिल थकीत आहे. महावितरण कार्यालयाकडून वेळोवेळी स्मारणपत्र देऊनही वीज बिल भरण्यात आले नाही. 


यावर करवाई करत ही वीज कापण्यात आलीय. मात्र, यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत. 


अजिंठा आणि वेरूळ या दोन्ही जगप्रसिद्ध स्थळ आहेत. अशा पद्धतीने वीज कापल्यामुळे पर्यटनस्थळांची बदनामी होत असून महाराष्ट्र पर्यटन विभाग याबाबत किती गंभीर आहे, हेच या प्रकरणावरून समोर येतंय.