राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नाही; कठोर निर्बध लावण्यात येणार
मुख्यमंत्र्यांनी बोलावल्या बैठकीतील मोठा निर्णय
मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण आज झालेल्या बैठकीत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नसल्याचा पण कठोर निर्बध लावण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू होणार आहेत .
राज्य सरकारकडे दोन पर्याय होते. एक म्हणजे पूर्ण लॉकडाऊन आणि दुसरा म्हणजे नियम अधिक कठोर करणं. तर सरकारने 30 एप्रिलपर्यंत नियम अधिक कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण 30 एप्रिलनंतर रूग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज झालेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. लॉकडाऊन नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता 30 एप्रिलपर्यंत नागरिकांना नियमांचं पालन करत आपली कामं करता येणार आहेत.