हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये `मराठी`ला डावलले
हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये मराठी भाषेला जाणीवपूर्वक डावलल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : हावडा-मुंबई एक्सप्रेसमध्ये मराठी भाषेला जाणीवपूर्वक डावलल्याचे दिसून येत आहे. या एक्सप्रेसमधील सूचना देणाऱ्या पाट्या या हिंदी, इंग्रजी आणि बांग्ला या भाषेत दिसतायत.
पण मराठी भाषेला यामध्ये स्थान न दिल्याचे समोर येत आहे.
सोशल मीडियात व्हायरल
१२३२१ हावडा मुंबई गाडीतील हे फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'गाडी उभी करण्यासाठी साखळी खेचा' ही सूचनाही मराठी सोडून इतर भाषांमध्ये दिसत आहे.
एवढेच नव्हे तर शौचालय उपयोगाच्या सूचना देखली हिंदी, इंग्रजी आण बांग्ला भाषेतच दिसत आहे. रेल्वे प्रशासनातर्फे जाणिवपूर्वक मराठी भाषेला डावलल्याचा आरोप होत आहे.
जाग येणार का ?
यानंतर तरी रेल्वे प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.