जयेश जगड, झी मीडिया, अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारने काही अटी आणि नियम तयार केले आहेत. मात्र याचा फज्जा उडतांना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. संसर्गाची सर्वाधिक भिती नागरिकांना प्रवासात जाणवत आहे. मात्र तरीही नागरिक बिनधास्त बिना मास्क फिरतांना दिसत आहेत. अकोला पोलिसांनी अशा ऑटो चालकांवर आता दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.शहरात आता ' नो मास्क नो सवारी ' ही मोहीम सुरू करण्यार आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अकोल्याच्या रस्त्यांवर अशे स्टिकर लावून ऑटो फिरतांना दिसत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अकोला पोलिसांनी ' नो मास्क नो सवारी ' मोहीम सुरू केली आहे. शहरातील प्रत्येक ऑटो वर शहर वाहतूक पोलीस तर्फे पोस्टर्स लावण्यात येत आहे. या आधी सुद्धा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी शहरात सर्व सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो डील या सारखे उपक्रम सुरू केले आहेत.


शहरात दररोज जवळपास 2000 ऑटो धावत असल्याने या मधून हजारो प्रवासी प्रवास करीत असतात,या मोहिमेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना प्रबोधन करणे शक्य झाले आहे. मात्र सूचना न मानणाऱ्या ऑटोवर दंडात्मक कारवाई सुद्धा होणार आहे. पोलीस अधिक्षकांची मुख्यमंत्र्यांसोबत काल झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये या महिनेच कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.


अकोला पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला ऑटोचालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोहीम यशस्विरिते राबविण्यासाठी ऑटो चालकांची गजानन शेळके यांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत स्वतः मास्क घालावे व ऑटो मध्ये प्रवास करणाऱ्या सवारीला सुद्धा मास्क घालणे बंधनकारक करावे अशी सूचना दिली आहे.



यामुळे आता सवारी मास्क घालण्यासाठी मनाई करत असेल तर अशा प्रवाश्यांना ऑटोमध्ये प्रवेश मिळणार नाही. या माध्यमातून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेता येणार असल्याचे आता ऑटो चालक म्हणत आहे. मोहिमेला ऑटो चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  


अकोला पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम कौतुकास्पद आहे मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही मोहीम राज्यभर चालवणे आता तितकेच गरजेचे झाले आहे.