मुंबई : आता खासगी गाडीतून प्रवास करताना मास्क नाही लावला तरी चालणार आहे. विनामास्क खासगी गाडीतील प्रवाशांवर कारवाई न करण्याच्या सूचना, क्लीन अप मार्शलना मुंबई महानगरपालिकेनं दिल्या आहेत. मास्क न लावल्यामुळे मुंबईकरांना क्लीन अप मार्शल दंड करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे खाजगी गाडीतून प्रवास करताना मास्क न वापरणाऱ्यांनाही क्लीन अप मार्शलकडून दंड आकारला जात होता. यावरून वाद होत होते. यावर महानगरपालिकेनं नवी मार्गदर्शक तत्वं तयार केली आहेत. 



त्यानुसार खासगी वाहनातून प्रवास करताना मास्क लावला नाही तरी चालणार आहे. मात्र प्रवासी वाहतुकीच्या रिक्षा, टॅक्सी किंवा मालवाहतूक करताना मास्क लावावाच लागणार आहे. अन्यथा दंड आकारला जाईल.