टोल नाक्यावर थांबण्याची गरज नाही
टोल नाक्यावर थांबण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे तुमच्या प्रवासातील वेळ वाचणार आहे.
मुंबई : टोल नाक्यांवरच्या लांबच लांब रांगा, गर्दी, रस्त्यांची दुरावस्था, वर्षानुवर्षे सुरू असलेले टोल अशा विविध कारणांमुळे वाहनचांलकांमध्ये टोल नाक्यांबद्दल रोष असतो. पण आता हा रोष काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला आता टोल नाक्यावर थांबण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे तुमच्या प्रवासातील वेळ वाचणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयने इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणालीत यश मिळाले आहे. त्यामुळे टोल घेण्यासाठी रांगेत न थांबता वाहनचालकांना इलेक्टॉनिक पद्धतीची मदत होणार आहे.
फास्टॅग लेन
रस्ते परिवहन मंत्रालयाने यासंबंधीचे एक पत्रक जारी केले आहे. शुक्रवारपासून सर्व टोल नाक्यांकर फास्टॅग लेन चालू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक आता न थांबता प्रवास करू शकतात असे या पत्रकात म्हटले आहे.
ऑनलाईन, ऑफलाईन सेवा
फास्टॅग हा आरएफआयडी टॅग असून बँकांच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही सेवा उपलब्ध आहे. याचा वाहनचालकांना फायदा होणार आहे.