Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहीले. बाबासाहेबांनी लिहीलेल्या संविधानावरच देश चालतो. बाबासाहेबांनी लिहालेले संविधान बदलण्याचा डाव असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. याच आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेच जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले आहे.  जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलवू शकत नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संविधान बदणार असे अनेकजण बोलत आहेत. मात्र, जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कोणी बदलवू शकत नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना थेट जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले आहे.  बाबासाहेबांच्या स्मारककरता काँग्रेसने एक इंचही जमीन दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 हजार कोटीची जागा दिली. लंडन मधील बाबासाहेबांचे घर काँग्रेसचे लोक वाचवू शकले नाही.  हे बेगडी लोक आहेत. फक्त मताकरता त्यांना आंबेडकरांची आवश्यकता आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


देशात दोनच गट  एक मोदींचा आणि दुसरं  गट  राहुल गांधीचा.  मत मोदींना द्यायचे आहे.  मोदींच्या नेतृत्वात भारत बदलला आहे. 25 कोटी लोकांना गरिबी रेषेतून बाहेर काढले.  काँग्रेसचे लोक पोपट सारखे बोलत आहेत. काँग्रेसमध्ये रेती चोर लोक आहे.  प्रत्येक रेती चोराला हिशोब दयावा लागेल. काँग्रेसचा नेता त्यांना सरक्षण देतोय असा आरोप फडणवीस यांनी केला.  
आता अमेरिका आणि रशियाकडे असलेल्या मिसाईल भारतातकडे आहेत. या मिसाईलची रेंज 7 हजार किमी इतकी आहे.  भारताकडे चीन आणि पाकिस्तान वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाचे नेते आहेत. आफ्रिकन देश मोदींना आमचे नेतृत्व करा असं सांगत आहेत.  


नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात  नागपूरचा कायापालट झाला आहे. समृद्धी महामार्ग भंडारा गोंदिया पर्यंत नेला जाणार आहे. नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्ग काम आम्ही हाती घेतले आहे. रामटेकमध्ये आपला नारा आहे नो बर्वे ओन्ली पारवे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राजू पारवे यांचा प्रचार केला. 


भाजप संविधान बदलणार ही अफवा 


भाजप संविधान बदलणार ही अफवा आहे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय.. आजचा भाजप बदललाय, सर्व जाती-धर्मांचा पक्ष झालाय, असंही विधान आठवलेंनी केलंय.. डोंबिवलीत आयोजित राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेत आठवलेंनी हे वक्तव्य केलंय..