`कुणीही फायनल नाही`, देवेंद्र फडणवीसांचा नगरसवेकांना इशारा
भाजपचं `मिशन महापालिका इलेक्शन` सुरु
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : भाजपचं नागपुरात 'मिशन महापालिका' सुरु झालं असून त्यादृष्टीनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांचा चांगलाच क्लास घेतला. 'आसपास स्पर्धा करू नको, प्रभागातील नगरसेवकांनी तातडीनं दिलजमाई करा. कुणाचेही तिकीट फायनल समजू नका. (No one is final, Opposition Leader Devendra Fadnavis warns BJP corporators at Nagpur ) तुमचा परफॉर्मन्स आणि जनमत विचार करूनचं उमेदवारी दिली जाईल,'' अशा शब्दात फडणवीसांना नगरसवेकांना सुनावले. शनिवार संध्याकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर रात्री एका हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांची बैठक घेत फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप 'मिशन महापालिका इलेक्शन' सुरु झालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रमुख नेते, आमदार यांच्या उपस्थित नगरसेवकांची शनिवारी रात्री बैठक घेतली. यावेळी फडणवीसांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना कानही टोचले. नगरसेवकांनी जनसंपर्क वाढविण्यास सांगताना आपसातील मतभेद घरी ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
प्रत्येकाच्या कामाचे ऑडिट होईल. प्रत्येक नगरसेवकानं गेल्या पाच वर्षांतील कामाची कार्यपुस्तिका काढण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. महापाविकास आघाडीन नागपुरला वा-यावर सोडले आहे. राज्या सरकारचे अपयश दाखविणारे मुद्दे जनतेसमोर मांडण्याच्या टीप्सही फडणवीसांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले विकास काम जनतेपर्यंत पोहवण्यासही त्यांनी नगरसेवकांना दिल्या.
त्याचबरोबर कोरोनाच्या संकटकाळात कार्यकर्त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती घरोघरी, जनतेपर्यंत पोहवण्यासही सांगितलं. नगरसेवक आणि पदाधिकां-यांमधील कुरबुरींवर बोट ठेवताना फडणवीसांनी काही नगसेवक आपली वस्ती म्हणजे बालेकिल्ला असा समज करून घेत आहे. त्यांच्या भागात संघटनेचे पदाधिकारी गेले की त्यांना खटकते ..तो नगरसेवक त्याला प्रतीस्पर्धा समजतो. त्यामुळं कुणीही आपले तिकीट कापू शकत नाही असा गैरसमज ठेवू नका असा इशाराही दिला..
महापालिका निवडणुकांना आता सहा महिन्यांचाच कालवधी राहिला आहे. त्यादृष्टीनं फडणवीसांनी नगरसेवकांना केलेलं हे मार्गदर्शन, क्लास म्हणजे पक्ष आता मिशन इलेक्शनचं मोडमध्ये आलंय. महत्वाचं म्हणजे या भाजपची ज्येष्ठ नेते नगरसेवकांच्या कामावर खूश नसल्याचं चित्र या बैठकीत दिसून आलं.