गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात असलेल्या गोदावरी नदीकाठच्या 8 गावांना जायला रस्ताच नाही आहे. गावकऱ्यांनी अनेक आंदोलन करुनही रस्ता काय मिळाला नाही, त्यामुळं या गावातील 7 तरुणांनी जोपर्यंत गावाला पक्का रस्ता मिळणार नाही तोपर्यंत बोहल्यावर न चढण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील लासिना भागातील आठ गावांना जोडणारा हा रस्ता पाहा. याला रस्ता म्हणायचं का असाही प्रश्न पडतो. या रस्त्यावर गाडी काय बैलगाडीही जाणार नाही. लासिना पंचक्रोशीतील लोकांनी रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार घातला तरीही प्रशासनानं दखल घेतली नाही. त्यामुळं लासिनाच्या सात तरुणांनी रस्ता होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे.



लासिनातल्या रस्त्यांची अवस्था पाहता कोणताही वधूपिता या गावात त्याची मुलगी देणार नाही. त्यामुळं प्रतिज्ञा केली नसती तरीही या गावातल्या तरुणांची लग्न होणार नाहीत. निर्वाणीवर आलेल्या तरुणांची अडचण समजून मायबाप सरकार आता तरी या गावांना रस्ता देणार का हेच बघणं औत्युसक्याचे ठरणार आहे.