पिंपरी-चिंडवड : तुम्ही कोविडची लस घेतलीय का ?. लस लवकर घ्या... कारण लस घेतली नाही तर पगार मिळणार नाही, असा फतवा काढण्यात आलाय. कुठे काढण्यात आलाय असा फतवा, तुम्ही तिथले कर्मचारी तर नाही ना....?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० जुलैपर्यंत लस घ्या, नाही तर पगार विसरा 


लस घ्या, लस घ्या अशा वारंवार सूचना देऊनही कर्मचारी ऐकत नाहीत. त्यामुळे लस नाही तर पगार नाही असा फतवा काढलाय पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी...


पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत ७ हजार ४७९ अधिकारी, कर्मचारी, शिक्षक काम करतात. तिसऱ्या लाटेपुर्वी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी असा फतवा काढण्यात आलाय 
अधिकारी कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी २० जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलीय. त्यानंतर लस न घेतल्यास पगार मिळणार नाही 


कर्मचारी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केलंय. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय आहे.