नागपूरात चार झोनमध्ये 2 आणि 3 सप्टेंबरला पाणीपुरवठा राहणार बाधित
कन्हान-1300 मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीसाठी 24-तासांचे शटडाऊन
नागपूर: शहरातल्या लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोनमधील 28 जलकुंभांचा पाणीपुरवठा 2पासून 3 सप्टेंबर संध्याकाळी पाचपर्यंत बाधित राहणार आहे. महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र वरून शहराकडे येणाऱ्या 1300 मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर कामठी रोडवरील साई मंदिरच्या मागे, पिली नदी येथील मोठी गळतीची दुरुस्ती काम होणार आहे. त्याचबरोबर सक्करदरा टाकीवर काही तांत्रिक कामाकरता आणि बाबुवन टाकीवर फ्लोमीटरची जोडणी करणे हे सर्व महत्वाच्या दुरुस्ती आणि तांत्रिक कामांकरता 24 तासांचे शटडाऊन घेण्यात येणार आहे. हे शटडाऊन 2 सप्टेंबर सकाळी 10 ते सप्टेंबर 3 सकाळी 10 दरम्यान घेण्यात येणार आहे
शटडाऊनमधील तांत्रिक काम संपल्यावर सप्टेंबर 2 ला संध्याकाळी 5 नंतर संध्याकाळचा पाणी पुरवठा असलेल्या भागांना कमी दाबाने आणि त्यानंतर पुढील 48 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाण्याचा अपवय टाळण्यासाठी 1300 मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर कामठी मार्गावरील साई मंदिरच्या मागे पिली नदी येथे असलेली ही मोठी गळती दुरुस्त करणे तसेच सक्करदरा टाकी वर तांत्रिक काम आणि बाबुलवन टाकीवर फ्लोमीटर ची जोडणी करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना याकालावधीत टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
शटडाऊन- कामामुळे या ठिकाणी पाणीपुरवठा राहिल बाधित
आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी 1 व 2, इंदोरा 1 व 2, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग
सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी 1,2अ व 2 ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग
नेहरूनगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन 1 व 2, सक्करदरा 1,2 व 3, ताजबाग व खरबी जलकुंभ
लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी 1 व 2 जलकुंभ