रत्नागिरी: जिल्ह्यामध्ये धबधबे, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी जाण्यास मनाई आदेश लागू करण्यात आलाय. पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात. मात्र, योग्य ती काळजी न घेतल्याने अनेकवेळा जिवीतहाच्या घटना घडतात. त्यामुळे पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.


३१ जुलै २०१८ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी, निवळी, रानपाट, पानवल, संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर, राजापूर तालुक्यातील सवतकडा, धूतपापेश्वर, चिपळूण तालुक्यातील सतवसडा या ठिकाणी १०० मीटर परिसरात ३१ जुलै २०१८ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार या ठिकाणी पाण्यात उतरणे, पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, खोल पाण्यात उतरणे, पोहणे, मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे इत्यादी कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.


 मालवण तालुक्यालाही समुद्री उधाणाचा फटका


दरम्यान, सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यालाही समुद्री उधाणाचा मोठा फटका आज बसला. तळाशील आणि आचरा येथील अनेक झाडे जमीनदोस्त झाली. असंच उधाण राहिल्यास पाणी वस्तीत घुसण्याची भीती आहे.  आचरा भागात तर अनेक घरांना धोका बसण्याची शक्यता आहे. समुद्र आणि घरांमध्ये काही मीटर अंतर राहिलंय.