Sanjay Raut : ठाकरे गाटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्हं आहेत. कारण संजय राऊत यांना मुंबई क्राईम ब्रँचकडून (mumbai crime branch) नोटीस देण्यात आली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय असा खळबळजनक आरोप, त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यासंदर्भातले पुरावे आणि माहिती देण्यासाठी, क्राईम ब्रँचकडून राऊतांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 


काय म्हणाले होते संजय राऊत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चालवली जाते असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.  मुख्यमंत्री कार्यालयातून कारागृहातल्या अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जातोय असा आरोप राऊतांनी केला होता. गृहमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष द्यावं असा सल्ला राऊतांनी दिला. तर राऊतांचे आरोप बेछुट आणि खोटे असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला होता.


मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चाललीय या संजय राऊतांच्या टिकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिल होते. ज्यांची पूर्ण कारकिर्द गुंडांशी मांडवली करण्यात गेली, त्यांच्या बोलण्यावर जनता विश्वास ठेवणार नाही असा पलटवार नरेश म्हस्के यांनी केला होता. 


संजय राऊत यांची चौकशी होणार?


राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांचे हे वक्तव्य आता त्यांनाच भारी पडणार असे दिसत आहे. कारण आता क्राईम ब्रांचने नोटीस पाठवून या आपरोपासंदर्भातील  पुरावे आणि माहिती मागवली आहे. यामुळे संजय राऊत यांचा जबाब देखील नोंदवला जाऊ शकतो. 


शिंदे गटाला अजित पवारांची धुणी भांडी करावी लागतील - संजय राऊत


शिंदे गटाला अजित पवारांची धुणी भांडी करावी लागतील असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप पार पडलं. अजित पवारांकडे अर्थखातं सोपवण्यात आलं. विशेष म्हणजे अजित पवारांविरोधातच तक्रार करत शिंदे गट सत्तेतून बाहेर पडला होता. त्यावरुनच संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तर, विरोधक बावचळले असून तीन पक्षात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं उत्तर चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना दिले.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केलीय. मालकानं भाकर घातली नाही तर त्यांची उपासमार होईल म्हणून ते टीका करत असतात असा शाब्दिक वार विखे-पाटलांनी केला आहे.