अहमदनगर : अहमदनगर मधील प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर अडचणीत सापडलेत. कीर्तन करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सम तिथीला स्त्री सोबत संग झाला, तर मुलगा होतो आणि विषम तिथीला संग केला तर मुलगी होते, असं आक्षेपार्ह वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओझर येथे आपल्या कीर्तनात केलं केलेलं हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे, तसंच PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन आहे, असा आरोप करण्यात आला होता. 


या आरोपांनंतर PCPNDT सल्लागार समितीनं निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे. या नोटीशीनंतर पुरावे मिळाले, तर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.