प्रशांत शर्मा, झी २४ तास, शिर्डी : वारकरी संप्रदायात कीर्तनाला अनन्य साधारण महत्त्व आहे... अभंग, ओव्या, आर्या याची सांगड घालून प्रबोधन करणारी ही किर्तनकला... यातून फक्त भक्तीच नाही तर समाजजागृती आणि प्रबोधनाचं काम आजवर करण्यात आलंय. म्हणूनच आता चक्क इंग्रजीतून कीर्तनाची शाळा सुरू झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रमोद महाराज डुकरे हे शिर्डीजवळच्या बाPभळेश्वरमध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलमध्ये बीएसचे विद्यार्थी आहेत. एकीकडे न्यूटनचे नियम शिकताना ते इंग्रजीतून कीर्तनाचे धडेही गिरवतायत. गुरूकुलातले 20 विद्यार्थी असंच इंग्रजीतून कीर्तन करायला शिकत आहेत.


समाजाचं प्रबोधन करण्याचं काम कीर्तनकला करते. या कलेला भाषेच्या बंधनात न अडकवता जगभरात त्याचा प्रचार व्हावा, संतसाहित्य, त्यांची शिकवण देशविदेशात पोहोचावी, यासाठी नवनाथ महाराज म्हस्के विद्यार्थ्यांना तयार करतायंत.


इंग्रजी कीर्तनाच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगपासून ते दहशतवादापर्यंत सर्व विषयांवर ही मुलं प्रबोधन करतात. संतसाहित्याची ही पताका सातासमुद्रापार न्यावी, ही शुभेच्छा.