तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा
कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी सुखसोयी युक्त तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा देण्यात आलाय. अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे या गाडीच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी सुखसोयी युक्त तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा देण्यात आलाय. अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे या गाडीच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे.
कोकणातील चिपळूण हे एक महत्वाचे रेल्वेस्थानक असल्यामुळे त्याठिकाणी तेजस एक्स्प्रेसला प्रवासी थांबा मिळावा याकरिता शिवसेना खासदार विनायक राऊत यानी पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेय.
पुढील आठवडाभरात तेजस एक्स्प्रेस चिपळूण रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. तेजस एक्स्प्रेस येता-जाता चिपळूण रेल्वेस्थानकात थांबत होती. मात्र हा थांबा प्रवासी थांबा नसल्याने चिपळूणवासियांना त्याचा कोणताही फायदा होत नव्हता. पुढील आठवडाभरात तेजस एक्स्प्रेसला चिपळूणमध्ये प्रवासी थांबा मिळेल, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.