अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावात घडलेल्या न्यूड डान्स प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असताना मौदा तालुक्यातील भूगावमध्ये तसाच प्रकार घडल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतापजनक प्रकार समोर
नागपुरातल्या या न्यूड डान्सनं पोलिसांची झोप उडवलीय. काही दिवसांपूर्वीच उमरेड तालुक्यात ब्राह्मणी गावात हा नंगानाच सुरू होता. ब्राह्मणीमध्ये अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक न्यूड डान्सचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच मौदा तालुक्यातल्या भूगावात असाच नंगानाच झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नंगानाच
भुगावमध्ये काही आंबट शौकिनांनी 'लावणी डान्स हंगामा' या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली न्यूड डान्स केल्याचा संशय आहे. या डान्सच्या चौकशीसाठी महिला पोलीस उपअधीक्षकाच्या नेतृत्वात एक एसआयटी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 11 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यायत. अॅलेक्स उर्फ प्रबुद्ध बागडे या ऑर्केस्ट्रा संचालकालाही अटक करण्यात आलीय. 


'अलेक्स जुली के हंगामे' नावानं या न्यूड डान्सचं आयोजन होत असल्याची माहिती आहे. आता पोलिसांच्या तपासाची चक्रं वेगानं फिरू लागलीयत. 



सोशल मीडियामधून मेसेज
अलेक्सच्या फोनमध्ये अनेक महिला नर्तकींचे नंबर पोलिसांना मिळाले असून तो या सर्वांना घेऊन ग्रामीण भागात असेच न्यूड डांस आयोजित करतो का याचा तपास  पोलीस करत आहेत. दोन्ही ठिकाणी कार्यक्रमासाठी आयोजकांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती असंही समोर आलं आहे.  'अलेक्स जुली के हंगामे' आणि 'लावणी डान्सिंग हंगामा' या दोन्ही कार्यक्रमांचे मेसेज social media वर पाठवले गेले होते, असंही तपासात समोर आलं आहे.