पुणे : पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ४५७ वर पोहोचली आहे. सध्या १ हजार १३९ रुग्ण उपचार घेत आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४८ रुग्ण गंभीर आहेत. अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्हयात १ हजार ३१९ बाधीत रुग्ण असून ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात ३३ बाधित रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ६५ बाधीत रुग्ण असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात २९ बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात ११ बाधीत रुग्ण आहेत.


आजपर्यत विभागामध्ये एकूण १५ हजार ८११ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ९३५ चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ८७७ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १३ हजार ४२८ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १४३७ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील ५४ लाख ३५ हजार ५४६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत २ कोटी ६ लाख ३ हजार ९४ व्यक्तींची तपासणी केली गेली आहे.