प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : सर्वांना माणुसकीनं वागवणाऱ्या कोल्हापुरात माणुसकीशी खेळ केला जाऊ लागलाय. कोल्हापूरचा ओबामा अशी ओळख असलेल्या विनायक मकणापुरे याच्याबाबत नेमकं हेच घडलं आहे. काय आहे हा सारा प्रकार, त्यावरचा आमचा हा विशेष वृत्तांत...


कोल्हापूरचा ओबामा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमलेश बस की बस... केवढासा हाईस... या वाक्यांची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हाच व्हिडिओ आहे. प्रत्येकाच्या तोंडात कमलेश हेच नाव आहे. कमलेश म्हणजेच कोल्हापूरचा ओबामा अर्थात कोल्हापुरातील टिबंर मार्केट परिसरात राहणारा १४ वर्षांचा विनायक मकणापुरे... लहानपणापासून विकलांग असलेला विनायक शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ, मंगळवार पेठ भागात कोल्हापूरचा ओबामा म्हणूनच ओळखला जातो. गेल्या महिनाभरात विनायकचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. 


सोशल मीडियाची नशा...


काही टवाळखोरांनी सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट मिळवण्याकरता, विनायकचे रोज नवे व्हिडिओ काढले. त्यासाठी त्याला खाऊचं आमिष दाखवू लागले. पुढे व्हिडिओ करण्यासाठी काही टवाळखोरांनी विकलांग विनायकचा गैरफायदा घेत, त्याला गांजा, दारु आणि सिगारेटचं व्यसन लावलं. तर काहींनी त्याच्या नावावर पैसेही उकळले.


क्रूर चेष्ठा...


सोशल मीडिया जितका चांगला तितकाच वाईट हेच विनायक मकणापुरेच्या उदाहरणावरुन पुन्हा एकदा दिसून आलंय. सोबतच एखाद्याच्या असहायतेचा गैरफायदा घेत आपली करमणूक करुन घेणं कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ निर्माण झाली आहे.