रत्नागिरी : ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आलाय. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओखी चक्रीवादळ हळूहळू पश्चिम किनारपट्टीच्या लक्षद्वीप भागातून पुढे सरकत असून समुद्र खवळलेला आहे. त्याचा परिणाम आता कोकण किनारपट्टीलादेखील जाणवू लागलाय. 


हजारो मच्छिमारी नौका सध्या किनारपट्टीला लागल्या असून बंदर विभागाने देखील दोन नंबरचा बावटा लावलाय. मच्छिमारांनी कोणीही खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन सध्या बंदर विभागाकडून करण्यात आलंय. 


बंदर विभागाची टीम प्रत्येक तासाला या वादळाचं अपडेट घेत असून त्याची माहिती मच्छिमारांना देण्यात येतेय. पुढील 8 डिसेंबरपर्यंत खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये असं आवाहन बंदर विभागाकडून करण्यात आलंय.