COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून आदेशवजा केलेले अवाहन मनसे कार्यकर्त्यांनी नुसते ऐकलेच नाही तर, ते मनावरही घेतले आहे. बुलेट ट्रेनबाबत मनसेची असलेली विरोधात्मक भूमिका जगजाहीर आहे. ही भूमिका किती कट्टर आहे, याची प्रचिती बुलेट ट्रेनचा सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांना आज (सोमवार, ७ मे) आली. बुलेट ट्रेन मार्गाचा सर्व्हे करण्यासाठी काही अधिकारी असेल असता मनसे कार्यकर्त्यांनी मनसेस्टाईल आंदोलन केले. परिणामी सर्व्हे करण्यास आलेल्या या अधिकाऱ्यांना हा सर्व्हे थांबवावा लागला.