वाशिम : संशयास्पदरीत्या मृत्यू झालेले वाशिम येथील बीएसएफचे जवान सुनील धोपे यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी कारंजा लाड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो वाशिमकर, राजकीय नेते, प्रशासन, पोलीस आणि बीएसएफ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी बीएसएफ आणि महाराष्ट्र पोलीसांकडून धोपे यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. मेघालय येथे सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत सुनील धोपे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. धोपे यांचं पार्थिव सकाळी अमरावतीच्या शवगृहातून बीएसएफच्या वाहनाने कारंजा लाड येथे आणलं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.