औरंगाबाद : आतापर्यंत तुम्ही लहान मुलांसाठी आश्रम, अनाथांसाठी आश्रम किंवा वृद्धाश्रम किंवा पीडित महिलांसाठी आश्रम असं ऐकलं असेल. पण आता एक वेगळ्या प्रकारच्या आश्रमाची सध्या जगभरात चर्चा आहे. विवाहित पुरुषांसाठी हे आश्रम सुरू करण्यात आलं आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पुरुषांसाठी हे खास आश्रम उभारण्यात आलं आहे. या आश्रमाची सध्या सोशल मीडियासह देशात चर्चा सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐकायला विचित्र वाटत असलं तरी खरोखर हे आश्रम महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात सुरू करण्यात आलं आहे. या आश्रमात दिवसागणिक येणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 


कुठे आहे हे आश्रम 


मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रील औरंगाबाद जिल्ह्यापासून 12 किलोमीटर दूर शिर्डी मुंबई महामार्गावर हा आश्रम उभारण्यात आला आहे. हे आश्रम केवळ अशाच लोकांसाठी आहे जे आपल्या पत्नीच्या जाचाला किंवा त्रासाला खूप कंटाळले आहेत. आश्रमातून सल्ला घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 


पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्यांना दिला जातो सल्ला


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 500 लोकांनी येथे सल्ला घेतला आहे. हायवेवरून पाहिल्यावर ती लहान खोलीसारखी दिसते, पण आत गेल्यावर ती आश्रमासारखी दिसते. खोलीच्या एक ऑफिस तयार करण्यात आलं आहे. बायकोमुळे त्रासलेल्या लोकांना इथे सल्ला दिला जातो. 


रोज सकाळी आणि संध्याकाळी उदबत्ती लावून इथे पूजा केली जाते. दर शनिवारी, रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत पत्नी-पीडितांचे समुपदेशन केलं जाते. या आश्रमात छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून अनेक लोक सल्ला घेण्यासाठी येत आहेत. 


या आश्रमात राहणाऱ्या लोक खिचडी, भात आणि डाळ तयार करतात. आश्रमात सल्ल्यासाठी आलेल्या प्रसादरुपी पुरुषाला खिचडी खायला दिली जाते. आश्रमात तीन श्रेणी तयार केल्या आहेत. A, B आणि C अशा तीन श्रेणी आहेत. पत्नी आणि सासरच्या मंडळींमुळे त्रासलेला माणूस A श्रेणीत येतो. त्याचप्रमाणे कमी त्रासलेल्या लोकांना बी आणि सी श्रेणीत ठेवण्यात आले आहे.