पुणे : वीजबिलावरून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना आता आमदार महिलांना देखील गंडा घातला आहे. हॅकर्सनी एक नाही तर 4 महिला आमदारांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आई आजारी असल्याचं सांगत चक्क 4 महिला आमदाराला फसवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात एका तरुणाने राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक केली. आई आजारी असल्याचे सांगत आमदार मुकेश राठोडने महिला आमदारांकडे मदत मागितली. 


आमदारांनीही मदत म्हणून ती रक्कम ऑनलाईन माध्यमातून दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


विधानसभेतील काही आमदारांकडून देखील अशीच रक्कम घेवून फसवणूक केल्याने राठोडवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप आमदार माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, श्वेता महाले आणि देवयानी फरांदे यांची फसवणूक झाली .


गुगल पे वरून फसवणूक झाल्याने गुन्हा सायबर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला जर अशी कोणी मदत मागितली तर ती मदत करताना विचारपूर्वक करा. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.