प्रवीण तांडेकर / भंडारा :  तीव्र उकाड्याने सगळेच हैराण झाले आहेत. मे महिन्यात सूर्य आग ओकत आहे. जंगलातील तलाव कोरडे थक्क पडले आहेत. त्याताच वन्य प्राणी पाण्याच्या शोधत फिरत असतात त्यामुळे वन्य प्राण्यांची गैर सोयसोय होऊ नये यासाठी वनविभाग जंगलात वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. वन्य प्राण्यांचा पाण्यावाचून जीव कासावीस होतो. मनुष्य असो वा प्राणी सर्वांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वन विभागाने जंगलात पाणवठे तयार केले आहेत. काही नैसर्गिक तर काही कृत्रिम पानवठ्यांची निर्मिती वन्य जीवांसाठी तृष्णतृप्तीचे ठिकाण झाले आहे. भंडारा वनपरिक्षेत्राधिकरी विवेक राजूरकर यांनी त्यांच्या वन कार्यालयाच्या अधिनस्त वनक्षेत्रात पानवठ्यांची निर्मिती केली आहे. 



या पाणवठ्यांवर वाघ, अस्वल, नीलगाय, चितळ, काळवीट यासह अन्य प्रकारचे वन्यप्राणी तृष्णातृप्तीसाठी येतात. पाणी पिऊन झाल्यावर याच पानवठ्यामध्ये वाघाने क्षणभर विश्रांतीही केल्याचे रुबाबदार छायचित्र कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले आहेत.