पंढरपूर : महाराष्ट्राचे अराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे महापूजा करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित असतील. कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू असल्यामुळे विठू माऊलींच्या गाभा-यात सुरक्षा कारणास्तव फक्त एव्हढ्याच मान्यवरांना परवानगी देण्यात आली आहे.


श्री विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा वेळापत्रक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटे २.१० ला मुख्यमंत्री मंदिरात दाखल
२.२० शासकीय महापूजा संकल्प
२.३० शासकीय महापूजा सुरू
३.०० पर्यंत महापूजा संपन्न
३.०५ श्री रुक्मिणी देवी शासकीय महापूजा
३.३५ पर्यंत महापूजा
३.४० मुख्यमंत्री यांचा सत्कार


वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपुरला पूजेकरता जाणार आहे, असं मुख्यमंत्री यांनी सोमवारी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं. यावेळी फक्त मुख्यमंत्र्यांचे कुटुंबिय आणि मानाचे वारकरी जे पूजा करणारे आहेत त्यांनाच फक्त गाभाऱ्यात आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. 


यंदा विठ्ठल ज्ञानदेव बडे हे मानाचे वारकरी विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहेत. बडे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगूळचे रहिवाशी आहेत. यंदा दर्शन रांग नसल्याने मंदिर समितीमधून मानाचे वारकरी निवडण्यात आले आहेत. विणेकरी म्हणून सेवा करणाऱ्या ६ जणांमध्ये चिठ्ठी काढून निवडण करण्यात आली.