अहमदनगर : पोलीस गस्त घालत असताना आज पहाटे नगर येथे एक कोटी रुपये किमतीचा गांजा पकडण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांना संशय आल्याने वाहनांची तपासणी करण्यासाठी हात दाखवला. मात्र, चालकांनी वाहने थांबविली नाहीत. पहाटे पेट्रोलिंग करताना या वाहनांचा पाठलाग करुन पोलिसांनी अडवली. त्यानंतर पाहणी करताना चादरी आणि फडक्यात कांजाची पाकिटे आढळलीत.


तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दोन महिलांसह एकूण पाच जणांना अटक केली. पहाटे पेट्रोलिंग करताना पाठलाग करून  गांजा घेऊन जाणारी दोन वाहने पकडली. अटक करण्यात आलेले सगळे हे नगर जिल्ह्यातील आहेत.