प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे :  सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे चुकीचे आहे. मात्र, अनेक जण नेमकं याच्या विरोधात कृती करतात. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे(Dhule) जिल्ह्यात ही  धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे(Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरपूर शहरातील मराठा गल्ली भागात ही घटना घडली आहे. रामभाऊ माळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मनोज मराठे नावाचा तरुण मराठा गल्ली परिसरात लघुशंका करत होता. यावेळी रामभाऊ याने मनोज याला सार्वजनिक ठिकाणी लघुशंका का करतो असे विचारले. 


यावरुन रामभाऊ आणि मनोज यांच्यात बराचवेळ वाद झाला.  रागाच्या भरात मनोज मराठे याने रामभाऊ माळी याला हाताबुक्यांनी मारहाण करत रस्त्यावर त्याचे डोके रस्त्यावर आपटले. यात रामभाऊ माळी याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. 


आपल्या हातून रामभाऊ याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मनोज भयभीत झाला.  यानंतर संशयित मनोज मराठे घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेची माहिती मिळतात शिरपूर पोलिसांनी एका तासाच्या आत आरोपीला मनोज मराठे याला अटक केली.  या प्रकरणी शिरपुर पोलीस ठाण्यात मनोज विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पत्ता विचारल्याने वकिलाच्या पायावर कार घातली


पत्ता विचारल्याच्या रागातून एका ऑडी कारच्या मालकानं वकिलाच्या पायावर कार चढवल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी पुण्यात घडला आहे. व्यवसायाने वकिल असलेले विशाल सोनवणे जंगली महाराज रस्त्यावर उभे होते. यावेळी त्यांनी येथून जाणाऱ्या एका ऑडीमालकाला ज्ञानमुद्रा क्लासेसचा पत्ता विचारला.  तू कुणाला पत्ता विचारतो? माझ्याकडे ऑडी आहे. पत्ता विचारून तू माझ्या स्टेटसला धक्का पोहचवतोयस, असं म्हणत ऑडीमालक(Audi Car Owner) वकिलासह(Lawyer) भांडायला लागला. यानंतर त्याने वकिलाच्या पायावरुन ऑडी कार नेली.