नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
कर्ज बाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कांद्याला भाव नसल्याने सटाणा तालुक्यातील ही घटना घडली.
नाशिक : सटाणा तालुक्यात कर्ज बाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कांद्याला भाव नसल्याने सटाणा तालुक्यातील भडाणे गावातील तात्याभाऊ खैरनार या शेतकऱ्याने कांद्याच्या चाळीत गळफास लावून आत्महत्या केली.
कांद्याला भाव नसल्याने थकीत कर्ज कसं फेडावं या विवंचनेतून खैरनार यांनी ही आत्महत्या केली. दोन दिवसा पूर्वी ही घटना घडली. मात्र आत्महत्या का केली याचं कारण आज उघड झाले. तर दुसरीकडे सटाणा तालुक्यातील सारदे इथे घडली कर्जबाजारीला कंटाळून मनोज रामराव धोंडगे या शेतकऱ्याने आत्महत्या केली.
दरम्यान, राज्यात कांद्याचे बाजारभाव एकदम गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. कांद्याचे बाजारभाव ढासळल्याने शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, काद्याचे दराबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने शेतकरी टोकाचे पाऊल उचल असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. कांद्याचे बाजारभाव वाढावे यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले.