कांद्याच्या बाजार भावात दुसऱ्या दिवशीही घसरण
लासलगावमध्ये कांद्याच्या बाजार भावात आज सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली आहे.
नाशिक : लासलगावमध्ये कांद्याच्या बाजार भावात आज सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समिती कांद्यामध्ये ७०० रुपयांची घसरण झाली आहे. परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात होणारा कांदा आणि नवीन लाल कांद्याची देशांतर्गत आवक दाखल होत असल्याने बाजार भावात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
आज कांद्याला कमाल ४ हजार ७११ रुपये , सर्वसाधारण ३ हजार ४०० रुपये तर किमान १००० रुपये बाजार भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर मंगळवारी - कमाल ५ हजार ३०० रुपये , सर्वसाधारण ४ हजार रुपये तर किमान १००१ रुपये बाजार भाव कांद्याला मिळाला. लासलगावात कांद्याच्या बाजार भावात आज सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर ७०० रुपयांनी गडगडले. त्यामुळे कांद्याचे भाव उतरण्याची शक्यता आहे.
देशातील इतर भागातून तसंच विदेशातूनही कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे लासलगाव बजारात सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचे भाव गडगडले आहेत. कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला होता. मात्र आता ऐन दिवाळीच्या तोंडावर या सर्वांना कांद्यानं रडवले आहे.
6\