नवी मुंबईत माथाडी कामगारांचा अचानक संप, कांदा-बटाटा मार्केट बंद
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural produce market committee) आज माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारल्याने कांदा-बटाटा मार्केट बंद आहे.
नवी मुंबई : Onion-potato market News : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural produce market committee) आज माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारल्याने कांदा-बटाटा मार्केट बंद आहे. (Mathadi workers strike in Navi Mumbai, onion-potato market closed) माथाडी कामगारांच्या या संपामुळे एपीएमसी बाजारपेठेबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. (Onion-potato market closed in Mumbai Agricultural produce market committee)
माथाडी कामगारांनी 50 किलोवरील गोणी उचलण्यास नकार नकार दिला आहे. त्याचवेळी कांदा-बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामकारांनी आंदोलन सुरु केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक कांदा-बटाटा बाजारात 50 किलोहून अधिक वजनाच्या मालाची गोणी कामगार उचलणार नाही, अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतली आहे.
आज अचनाक बंद पुरकारत माथाडी कामगारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत पन्नास किलोहून अधिक वजनाच्या आलेल्या मालाच्या गोण्यांना कामगारांनी हातही लावला नाही. कामगार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यामुळे बाजार समितीने पन्नास किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या असल्याचे सांगत बाजार समितीच्या बाहेर मालवाहतूक गाड्या माथाडी कामगारांनी रोखून धरल्या आहेत.
व्यापारी 50 किलो पेक्षा जास्त माल मागवत असल्याचा आरोप माथाडी कामगारांनी केला आहे. माथाडी कामगार 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलणार नाहीत, असे स्पष्ट मत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.