धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. 


किमान आधारभूत किमतीचे गाजर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किमान आधारभूत किमतीचे गाजर सरकार दाखवत असेल, तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला दीड हजार ते १७०० रुपया पर्यंत दर मिळत आहेत. 


कांद्याच्या दरात घसरण


उन्हाळी कांदा विक्रीला आला तर या दरात अजून बदल अपेक्षित आहे. कांदा निर्यात मंदावल्याने कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.