नाशिक : लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले आहेत. कांद्याचे भाव १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलनं घरसलेत. 


किती आहे भाव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल माथाडी कामगारांच्या संपामुळे बाजार समिती बंद होती. त्यात आज कांद्याची आवक वाढल्यानं कांदा गडगडलाय. आज बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव १ हजार ९०५ तर सरासरी भाव १६०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे.


आधी किती होते भाव?


परवा बाजार समितीत कांदा २ हजार ३०० रुपये क्विंटल होता. तर कांद्याचा सरासरी भाव २ हजार १५० इतका होता. दरम्यान बाजार समितीकडून कांद्याचं निर्यात मूल्य कमी करण्याची मागणी होतीये. कांद्यावरील निर्यात मुल्य कमी झाल्यास परदेशा कांदा पाठवता येणार आहे.