अकोला : मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणाराय, अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय. 


तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्यात त्यांच्या हस्ते तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात दोन दिवसात सर्वत्र तूर खरेदी केंद्र सुरू होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


तर व्यापाऱ्यांचे परवाने रद्द


आठवडाभरात तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील, हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापा-यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. 


हरभरा खरेदीसाठी प्रस्ताव


त्याशिवाय हरभरा खरेदीसाठी नाफेडकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, लवकरच खरेदी सुरू करण्यात येईल, असंही देशमुखांनी सांगितलं.