वसईत ओपो मोबाईलचा अचानक स्फोट
वसईत मोबाईलचा स्फोट झाला आहे, मोबाईलचा स्फोट कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाही.
वसई : वसईत मोबाईलचा स्फोट झाला आहे, मोबाईलचा स्फोट कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाही. वसईतील दिनानाथ दूबे यांच्या ओप्पोच्या मोबाईलनं अचानक पेट घेतला. मोबाईल चार्जिंगला लावला असताना आधी त्यातून धूर आला आणि त्यानंतर मोबाईलनं पेट घेतला. हा मोबाईल घेऊन अवघं एक वर्ष झालं होतं. आणि मोबाईलमध्ये कोणताच बिघाडही झाला नव्हता. तरी अचानक हा प्रकार घडल्यानं दीनानाथ हे संतप्त झालेत. नशिबानं हा मोबाईल कोणी हाताळत नव्हतं. नाहीतर कोणीतरी यामुळे निश्चितच जखमी झालं असतं. मात्र सुदैवाने असं काही झालं नाही. ओपो हा संपूर्ण चीनी बनावटीचा फोन असल्याचं सांगण्यात येतं, पण फक्त चीनमध्ये तयार होणाऱ्या मोबाईलचाच स्फोट होतो असं नाही.
आपल्या मोबाईलचा स्फोट होवू नये म्हणून त्याला चार्जिंगला लावला असताना बोलू नये, तसेच इंटरनेट सुरू असताना अनेक अॅप्लिकेशन्स ऑन करू नयेत.