नवी मुंबई : मुलीसोबत लग्न (marriage) करायला नकार दिल्याने शेजारी राहणाऱ्या तरुणाने रागाच्याभरात आईसह मुलीची हत्या केली. (Mother-daughter murder in Panvel ) त्यानंतर मुलीच्या वडिलांवर वार केले. ही घटना सकाळी दहा वाजता पनवेलमधील (Panvel ) पारगाव (Pargoan) येथे घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीशी लग्न लावून देण्यास नकार दिल्यानंतर प्रकाश मोरे यांने मुलीची आणि तिच्या आईची हत्या केली. यावेळी त्यांने मुलीच्या वडिलांवरही हल्ला केला. हल्ल्यानंतर प्रकाश हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.