नागपूर: बोंडअळी, मावा तुडतुड्याच्या मदतीबाबत सरकारच्या उत्तरावर विरोधकांनी मध्यरात्री अधिवेशनात ठिय्या आंदोलन केले. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलेलं नाही असा विरोधकांचा आरोप आहे.


मध्यरात्रीपर्यंत अधिवेशन सुरू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यरात्री साडेबारा वाजता विधानसभेचं कामकाज संपले मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादीचे आमदार हे सभागृहातच ठिय्या मांडून बसले होते. यावेळी आंदोलकांशी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सरकारच्या वतीने संवाद साधला. पण विरोधी आमदार आंदोलनावर ठाम होते.


एक वाजून ४ मिनीटांनी आंदोलन स्थगित


दरम्यान मुख्यमंत्र्यांनी फोनवर आश्वासन दिल्याने रात्री एक वाजून ४ मिनीटांनी आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी विखे यांनी मुख्यमंत्री आज सकाळी ११ वाजता याबाबत घोषणा करण्याचे असल्याचे सांगितले आहे.
विरोधकांकडून बोंडअळी, मावा तुडतुडा प्रश्नी अधिवेशनात ठिय्या आंदोलन