नागपूर: विधानपरिषदमध्ये अभूतपूर्व गोंधळ झालाय. सत्ताधारी स्वतः वेलमध्ये उतरलेत. स्वत: गिरीश महाजन हे मंत्री असून वेलमध्ये उतरले.  वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षातील अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे उपस्थित केला होता. या प्रश्नावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला.


विरोधकांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांचा विरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाड्याला वैद्यकीय प्रवेशात सर्वात कमी जागा असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी यांना धारेवर धरले.  मराठवाडामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील कोटा हा १९८५ पासून असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. मात्र, यावर संतापलेल्या विरोधकांनी गोंधळ घातला आणि या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे अशी मागणी केली. विरोधकांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला.


सत्ताधाऱ्यांची स्टंटबाजी


दरम्यान, विरोधकांच्या मागणीला विरोध करताना सत्ताधारी पक्षाही वेलमध्ये आल्याने आगोदरच सुरू असेल्या गोंधळात अधिक भर पडली. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनही वेलमध्ये उतरल्याचे चित्र बघायला मिळाले. महाजन यांच्या वर्तनावर आक्षेप घेत विरोधकही वेलमध्ये उतरले. या गोंधळामुळे विधानपरिषद कामकाज 10 मिनिटाकरता तहकूब करावे लागले.


अजबच! विरोधकांच्या विरोधात सत्ताधारी वेलमध्ये | Opposition criticism to government for Minister behavior issue