Passengers Travelling Without Ticket: हल्ली मुंबईसारख्या शहरात फुकट रेल्वे प्रवास (Ac Local) करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनानं कडक कारवाई करण्याची आता वेळ आली आहे. सध्या अशीच एक मोठी बातमी हाती येते आहे. ज्यात हजारो ग्राहकांनी फूकट महागजड्या एसी लोकलचा प्रवास केला आहे. मुंबईतील मध्य रेल्वेतील एसी लोकलमध्ये विना तिकिट (without ticket travel) प्रवाशांची गर्दी अधिक होत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या तब्बल 20 हजार 104 प्रवाशांकडे तिकीट नसल्याचं आढळलं आहे. तिकीट तपासनीसांच्या अपुऱ्या संख्येमुळे एसी लोकमधील विना तिकीट प्रवाशांचं चांगलंच फावलं आहे. (Over 20000 Passenger Travelled without ticket by Mumbai AC local Report Latest Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या एसी लोकलमध्ये जवळपास 22 हजार फुकट्या प्रवाशांनी प्रवास केला आहे. रेल्वे प्रशासनानं या फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या 2 महिन्यांत फुकट्यांची संख्या दुपटीनं वाढली आहे. 


हेही वाचा - Video: चक्क टॉयलेटमध्ये बनवली पाणीपुरी ? 'या' विक्रेत्याची हिंमत तर बघा


नव्या सोयी सुविधा 


मुंबईत नव्याने येणाऱ्या एसी लोकल अद्ययावत सोईसुविधांनी सुसज्ज असणार आहेत. लोकलच्या पहिल्या डब्ब्यातून सरळ शेवटच्या डब्ब्यात जाता येणार आहे. त्यासोबतच अग्निसुरक्षाही अधिक मजबूत केली जाणार आहेत. मुंबईच्या एसी लोकलमुळं डबेवाल्यांचं वेळापत्रक बिघडलं आहे. रेल्वे प्रशासनानं धीम्या मार्गावरही एसी लोकलची (local service in mumbai) सेवा सुरू केल्यानं डबेवाल्यांना सकाळच्या वेळी नोकरदारांच्या कामाच्या ठिकाणी डबा पोहोचवण्यास उशीर होतो तेव्हा त्यामुळं एसी लोकलचं वेळापत्रक बदलावं, अशी मागणी डबेवाले करता आहेत. 


एसी लोकलचीही दुर्दशा?


मध्यतंरी पावसाळ्यातही असाच एक संतापजनक प्रकार घडला होता. मुंबईच्या एसी लोकलला गळती लागल्याचं पाहायला मिळालं होतं. मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी येत असल्याची दृष्य समोर आली होती. मुंबईत पावासाचा जोर असताना शुक्रवारी संध्याकाळी सीएसएमटीहून 6 वाजून 36 मिनिटांनी कल्याणच्या दिशेनं निघालेल्या जलद एसी लोकलमधील डब्यातून पावसाचं पाणी आत आलं.  प्रवाशांनी एसी लोकलचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप केला होता.  


ज्येष्ठ नागरिकांचा विक्रमी मोफत प्रवास


एसटी महामंडळाने 75 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी 26 ऑगस्टपासून मोफत प्रवासाची सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे ज्येष्ठांचा अगदी सहजपणे प्रवास करता येत आहे. अगदी भाजीपाला आणण्यापासून ते छोटी मोठी काम 75 वर्षांवरील आजी-आजोबा लालपरीतून (st bus) प्रवास करीत आहेत. संभाजी नगर विभागात गेल्या चार महिन्यांत 11 लाख 24 हजार 834 ज्येष्ठांनी या सुविधेचा लाभ घेत लालपरी तून मोफत प्रवास केला. प्रत्येक महिन्याला मोफत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढतच चालली आहे. अनेकांना उपचारासाठी शहरात सुद्धा आता वारंवार येन सोपं झालं आहे.