मुंबई : मुसळधार पावसाने मुंबई अक्षरश: पाण्याखाली आली आहे. अजूनही पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईची रेल्वे, बससेवा ठप्प झाली आहे. रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा मुसळधार पाऊस केवळ मुंबईतच नाही तर राज्यातील इतर भागात कोसळला आहे. नाशिकमध्येही जोरदार पाऊस झाला. मुंबईसोबतच राज्यभरातही मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणीच पावसाने हजेरी लावली आहे. 


विदर्भ - विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.


मराठवाडा - मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. बीड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आहे. 


उत्तर महाराष्ट्र - नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पाऊस आहे. या सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तर सर्व धरणं भरली आहेत. गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.


कोकण - मुंबईप्रमाणेच कोकणालाही पावसाने झोडपलं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.