पद्मावत वाद: धुळ्यात एसटी बसवर दगडफेक
पद्मावत चित्रपटाविरोधात धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरात भडकला उडालाय. शिरपूरजवळच्या आमोदे गावात एसटीवर दगडफेक करुन एसटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
धुळे: पद्मावत चित्रपटाविरोधात धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरात भडकला उडालाय. शिरपूरजवळच्या आमोदे गावात एसटीवर दगडफेक करुन एसटी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अचानक आमोदे जवळच्या मंदीराजवळ एसटीवर दगडफेक करण्यात आली. शिरपूरहुन धुळ्याकडे जात असतांना ही घटना घडली. काही वेळा नंतर घटनास्थळी अग्निशमनदलाची गाडी पोहचली. सुदैवानं यात जिवीत हानी झालेली नाही.