चुकून पाकिस्तानात गेलेल्या आणि 15 वर्षांनंतर भारतात परतलेल्या गीताचं खरं नाव आणि कुटुंबीय सापडले आहेत. विशेष म्हणजे गीता महाराष्ट्रातीलच आहे. तिचं खरं नाव राधा वाघमारे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गीता ही मूळची महाराष्ट्राचीच लेक असून तिचं कुटुंबीय नायगावमध्ये राहतं. गीताच्या आईचं नाव मीना वाघमारे आहे. तिच्या वडिलांचं मात्र निधन झालं आहे.


गीता 8 वर्षांची असताना तिने भारत-पाकिस्तानची सीमा चुकून ओलांडलेली. त्यानंतर 2015 मध्ये तिला तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नानं भारतात आणण्यात आलं. गीता मूकबधिर असल्यानं आणि अगदी लहान वयातच चुकून पाकिस्तानात गेल्यानं तिच्या घरच्यांना शोधणं कठीण होतं.


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/Capture_4.JPG


 


गीताने तिला आठवत असलेल्या माहितीनुसार तिच्या कुटुंबियांचा शोध गेल्या 5 वर्षांपासून सुरू होता. इंदूरमधील आनंद सर्व्हीस सोसायटी तिचा सांभाळ करत होती.


गीताने भारताची सीमा चुकून ओलांडल्यानंतर कराचीमध्ये रेल्वे स्टेशनवर सामाजिक संस्था ईधी फाऊंडेशनला गीता सापडली होती. त्यानंतर ईधीने गीताचा आपल्या आश्रमातच सांभाळ केला. सुरूवातीला तिचं नाव फातिमा ठेवण्यात आलेलं. मात्र तिच्या वागण्यावरून ती मुस्लिम नसल्याचं फाऊंडेशनच्या लक्षात आलं. त्यामुळे तिचं नाव गीता ठेवण्यात आलं.


ईधी वेल्फेअर ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष अब्दुल सत्तार ईधी यांच्या पत्नी बिलकीस ईधी यांनी माहिती दिली आहे की, “आपली खरी आई भेटल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी गीताने ईधी फाऊंडेशनशी संपर्क केला होता.