पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय.
Pakistan Zindabad Slogans In Pune : देशभरात देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिल जल्लोषात साजरा होत असतानाच पुण्यात अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात पाकिस्तान जिंदाबादची नारेबाजी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. पोलिस या तरुणांची कसून चौैकशी करत आहेत.
पुण्यातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. कोंढवा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू आहे. दोन व्यक्ती या शाळा बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास हे दोघे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांनी दिलेले हे नारे ऐकले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलेल्या तरुणांचे नाव काय? हे कुठे राहतात याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही.
पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
यापूर्वी देखील पुण्यात पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी झाल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पीएफआयवरील कारवाईनंतर पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि 60 ते 70 पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केले होते.
पुण्यात दहशतवादी कारवाईप्रकरणी एकाला अटक
पुण्यात दहशतवादी कारवाईप्रकरणी आता आणखी एकाला अटक करण्यात आली होती. पुणे एटीएसने रत्नागिरीतून चौथ्या आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. दहशतवाद्यांना आश्रय देणा-या आरोपीला आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.. पुण्यात याआदी आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला संशयित दहशतवादी डॉ. अदनान अलीला अटक करण्यात आली होती. तर, पुण्यात पकडलेले दहशतवादी हे अल सफा संघटनेचे असल्याची माहिती समोर आली. दहशतवादी रतलाम मोड्युल राबवत होते. चांदोली, कामशेत आणि अलिबाग येथे बेस कॅम्प उभारण्याचा यांचा प्लॅन होता अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली.