Palasnath Temple : उन्हाळा आला की सुट्टीचे बेत आखले जातात. पालक मुलांना घेऊन बाहेर गावी फिरायला जातात. भारतातील थंड हवेचे ठिकाण अगदी परदेशातही जातात. पण महाराष्ट्रातही अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांची कल्पना आपल्याला नाही. असं एक सुंदर आणि अविस्मरणीय ठिकाण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बाराव्या शतकातील हे मंदिर 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. हे मंदिर पाण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. तुम्ही म्हणाल की वर्षातून 5 वेळा का पाहता येतं हे मंदिर...तर हे मंदिर इतर वेळी पाण्याखाली असतं. (Palasnath temple in Maharashtra seen only 5 times in last 46 years pune ujjani dam indapur Palasnath Temple video)


पाण्यात बुडालेला दुर्मिळ ठेवा पाहण्याची संधी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळा आला की, पुणे सोलापूरजवळील इंदापूरमध्ये इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी एकच गर्दी करतात. कारण उजनी धरणाच्या साठ्याचे पाणी कमी झाल्यावर तिथे असलेल्या पळसदेव गावाजवळील पळसनाथ मंदिराचं दर्शन होतं. एरवी पाण्याखाली बुडालेले हे मंदिर उन्हाळ्यात उजनी धरणातील साठ्या कमी झाल्यावर दिसतं. या मंदिरात जाण्यासाठी आधी होडी नंतर जमिनीवर जाण्याचा प्रवास अतिशय विलोभनीय असतो. 
पळसदेव गावाच्या किनाऱ्यापासून बोटीने या मंदिराकडे जावं लागतं. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचं असून बाराव्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर प्रस्थापित झालंय. सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा हा उणे 37 टक्क्यांवर गेलाय. त्यामुळे पर्यटकांना प्राचीन स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचे दर्शन होणार आहे.


अनेक वर्ष पाण्याखाली बुडालेल्या जुन्या गावाच्या गावखुणा मोकळ्या झाल्याने अनेकांच्या डोळ्यासमोर समृद्ध पळसदेव गावचं वैभव दिसतंय. गावाभोवती तट व तटाला भट, नाथ, चांभार आणि मुख्य चार वेशी पाहून आपले डोळे नक्कीच दिपून जातात. 


उजनी धरणाच्या बांधणीनंतर 1977 मध्ये जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर 24 वर्षांनंतर 2002 मध्ये 2013, 2017 आणि 2024 मध्ये हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आलं होतं. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता आणि व्याल अशा पंचशाखा अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे मंदिर आपल्याला मोहात पाडतं. 


हे मंदिर पाहण्यासाठी कसं जायचं?


पुणे - सोलापूर महामार्गावर पळसदेव गाव वसलंय. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तुम्हाला नदी दिसेल. या नदीपात्रापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी तुम्ही घेऊन जाऊ शकाल असा रस्ता आहे. त्यानंतर तुम्हाला होडीच्या मदतीने तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचता. स्थानिक मच्छिमार अल्प दरात होडीची सोय केली आहे. 



काय काय पाहिला पाहिजे?


इथे गेल्यावर तुम्ही ग्रामदैवत पळसनाथाचे प्राचीन मंदिर, बलीचे मंदिर, काशी विश्वनाथाचे मंदिर, मंदिरावरील शिलालेख, सप्तभुमिज शिखर, मंदिर गाभाऱ्यातील कोरीव शिला, सप्तसुरांची निर्मिती होणाऱ्या शिला आणि सतीची शिल्पे, वीरगळ हे उन्हाच्या चटक्यातही अल्हाददायक गारवा देणाऱ्या मंदिर परिसर तुम्हाला प्रेमात पडतो.